नांदेड नाका जलकुंभातून रविवारी पाणीपुरवठा; काही भागांत वितरणात बदल
लातूर, 13 जून (हिं.स.) : लातूर महानगरपालिका हद्दीतील नांदेड नाका जलकुंभातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात रविवारी 14 जून रोजी पाईपलाइन गळती दुरुस्ती तसेच बाभळगाव पोलीस ट्रेनिंग सेंटर व पोलीस मुख्यालयाला पाणी वितरण करण्याच्या कामामुळे काही भागांमध्ये नियो
पाणी पुरवठा


लातूर, 13 जून (हिं.स.) : लातूर महानगरपालिका हद्दीतील नांदेड नाका जलकुंभातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात रविवारी 14 जून रोजी पाईपलाइन गळती दुरुस्ती तसेच बाभळगाव पोलीस ट्रेनिंग सेंटर व पोलीस मुख्यालयाला पाणी वितरण करण्याच्या कामामुळे काही भागांमध्ये नियोजित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

शोभीत गायकवाड यांच्या समन्वयातून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले असून विविध भागांसाठी स्वतंत्र लाईनमन नियुक्त करण्यात आले आहेत.लाईनमन महमंद पठाण यांच्या कार्यक्षेत्रात मळवटी रोड, एकबाल चौक, साईबाबा नगर, बरकत नगर, सूर्यवंशी नगर, हिमायत नगर, आदम नगर, सिद्धेश्वर नगर, रिंग रोड जय नगर, सनत नगर, कुंभार लाईन, एस.ओ.एस., मोहन नगर, नांदेड रोड आदी भागांचा समावेश आहे.

लाईनमन आमोल कांबळे यांच्या कार्यक्षेत्रात राजीव नगर, पंचवटी नगर, संत गोरोबा सोसायटी, इंदिरा नगर, जयभीम नगर, आंजली नगर, सांबदे नगर, शास्त्री नगर, जीन्नत सोसायटी, यशवंत भैय्यासाहेब नगर, आनंद नगर, नांदेड रोड पोलीस क्वार्टर, भुईवाडा, तुळजापुरे नगर तसेच परिसरातील इतर काही भागांचा समावेश आहे.

लाईनमन जाकीर पठाण यांच्या माहितीनुसार लेबर कॉलनी, संजय नगर, होळकर नगर, मदनी चौक, माधव नगर, भंगी कॉलनी, इस्लामपुरा आदी भागांमध्ये आज काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला असून उर्वरित भागांना उद्या पाणीपुरवठा केला जाणार आहे.महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, नांदेड नाका जलकुंभातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसारच पाणी वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा.दरम्यान, बाभळगाव पोलीस ट्रेनिंग सेंटर व पोलीस मुख्यालयाला उद्या रात्री 10 वाजता पाणी वितरण करण्यात येणार आहे.कार्यकारी अभियंता मा. चव्हाण साहेब, जलकुंभ प्रमुख शाखा अभियंता प्रविण राजे आणि दिलीप गायकवाड यांनी सर्व सन्माननीय सदस्य व नळधारकांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande