रत्नागिरीचे ऍड. दीपक पटवर्धन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष
प्रशिक्षण आणि पारदर्शकतेवर भर देण्याचा व्यक्त केला निर्धार त्नागिरी, 13 जून (हिं.स.) | महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे ज्येष्ठ सहकार कार्यकर्ते अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली असून, रत्नागिरीतून या प
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला


प्रशिक्षण आणि पारदर्शकतेवर भर देण्याचा व्यक्त केला निर्धार

त्नागिरी, 13 जून (हिं.स.) | महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे ज्येष्ठ सहकार कार्यकर्ते अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली असून, रत्नागिरीतून या पदावर निवड झालेले ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. पुण्यात झालेल्या निवडणूक प्रक्रियेत (दि. 12 जून) त्यांची निवड झाली असून त्यांचा कार्यकाळ 16 महिन्यांचा असेल.

या निवडीनंतर रत्नागिरी नगर वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. पटवर्धन यांनी पतसंस्था चळवळीला अधिक विश्वासार्ह, सक्षम आणि पारदर्शक बनवण्यावर भर दिला. नियमांची काटेकोर अंमलबजावणी, संचालक मंडळाचे जबाबदार कार्य आणि अचूक नोंदी ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी राज्यभर अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, राज्यात आजही 19 हजारांहून अधिक पतसंस्था कार्यरत असून सुमारे सहा कोटी सभासद या चळवळीशी जोडलेले आहेत. 90,500 कोटी रुपयांच्या ठेवी आणि सुमारे 1,200 कोटी रुपयांचे भांडवल या व्यवस्थेत आहे. त्यामुळे ही चळवळ जनतेच्या विश्वासावर आधारित असून ती अधिक मजबूत करण्याची गरज आहे.

पटवर्धन यांनी प्रशिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याची संकल्पना मांडली. सध्या शिर्डी येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत असले तरी मध्यवर्ती आणि विभागीय उपकेंद्रे सुरू करून कोकणात, विशेषतः रत्नागिरी किंवा गणपतीपुळ्यात कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, सहकार कायद्यानुसार संचालक, कर्मचारी आणि सभासदांचे प्रशिक्षण आवश्यक असून फेडरेशन ही शासनमान्य प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा वापर करून प्रशिक्षण अधिक परिणामकारक केले जाईल.

पत्रकार परिषदेत त्यांनी अंशदान आणि सहकार कायद्यातील काही त्रुटींवरही भाष्य करत शासनाकडे ठोस सुधारणा सुचवण्याची भूमिका घेतली. पतसंस्था चळवळ अधिक शिस्तबद्ध आणि मूल्याधिष्ठित व्हावी यासाठी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम (सिलॅबस) तयार करून राज्यभर लागू करण्याचा त्यांचा मानस आहे.

या प्रसंगी संतोष थेराडे यांनी पटवर्धन यांच्या निवडीचे कौतुक करताना सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून त्यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार चळवळीला होणार आहे.

ऍड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था चळवळ अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande