कर्जमाफी न झाल्यास रस्त्यावर उतरू; शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा
सोलापूर, 14 जून (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या सर्व अटी तातडीने हटवून सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शश
sdfg


सोलापूर, 14 जून (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या सर्व अटी तातडीने हटवून सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार केवळ आश्वासनांची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांच्या आंदोलनावर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. रोहित पवार हे पांडुरंगाचे स्मरण करत आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर टीका करणारे वडापाव खात आंदोलन करत असतील, तो त्यांचा अनुभव असेल आणि त्यांनी तोच सांगितला असेल, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत असून कर्जमाफी हा त्यांचा हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न लावता सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभरातील शेतकरी आणि पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करतील, असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande