विनाकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून कधीच मतं मिळत नाहीत - मुख्यमंत्री
मुंबई, १४ जून (हिं.स.) : कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं, हे योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल, तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. तसेच इतर समाजाने देखील त्यांच्या परंपरेचा आदर केला पाहिजे.
फडणवीस


मुंबई, १४ जून (हिं.स.) : कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं, हे योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल, तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. तसेच इतर समाजाने देखील त्यांच्या परंपरेचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांची परंपरा आहे, त्यांनी इतर समाजाचा देखील आदर राखला पाहिजे. आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणं हेच महत्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेऊन त्यामध्ये राजकारण ओतणं यामुळे कधीच फायदा होत नाही, कधीच मतं मिळत नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. अनेकजण चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्यातील प्रत्येक गोष्टीला मी बोललंच पाहिजे, मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरुन मुंबईत वाद पाहायला मिळत आहे. मनसेसह शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल दादरमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई महानगरपालिकेला रस्त्यावर काढलेली पांढरी पट्टी पुसून टाकण्यास भाग पाडले. सदर प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घाटकोपर, दादरनंतर पांढऱ्या पट्टीचा वाद मुंबईत वाढत चालला आहे. दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता गिरगावमधील पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला असून गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मनसे आणि आम्ही गिरगांवकर संघटनेच्या कार्यकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande