
सोलापूर, 14 जून (हिं.स.)पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांनी सरकारला अंतिम इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या प्रकृतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रकृतीत काही प्रमाणात अशक्तपणा जाणवत असला तरी ते आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विविध शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आंदोलनस्थळी भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सरकारच्या भूमिकेकडे आणि रोहित पवार यांच्या प्रकृतीतील पुढील घडामोडीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड