परभणी जिल्ह्यातील बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा नवा आदर्श — जिल्हाधिकारी
परभणी, 14 जून (हिं.स.) : परभणी जिल्ह्यात महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पारदर्शकता, नियमबद्धता आणि प्रशासकीय निकड यांना सर्वोच्च प्राधान्य देत एक नवा
वशीला आणि हितसंबंधांना नाही थारा; प्रशासकीय निकड व पारदर्शकतेला प्राधान्य देत जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला बदल्यांचा नवा आदर्श


परभणी, 14 जून (हिं.स.) : परभणी जिल्ह्यात महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पारदर्शकता, नियमबद्धता आणि प्रशासकीय निकड यांना सर्वोच्च प्राधान्य देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अनेक वर्षे एकाच तालुक्यात किंवा उपविभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासनात गतिमानता आणि कार्यक्षमतेचा संदेश देण्यात आला आहे. गंगाखेड, पाथरी, सेलू आणि परभणी उपविभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर बदलण्यात आले आहे.

या बदल्यांमध्ये राज्य शासनाच्या धोरणानुसार आणि प्रशासकीय गरजांचा सखोल विचार करून एकूण 9 सहायक महसूल अधिकारी, 17 मंडळ अधिकारी, 51 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि 5 महसूल सहायक यांच्या बदल्या करण्यात आल्या.

बदली प्रक्रियेदरम्यान संबंधित कर्मचारी संघटनांशी संवाद साधून त्यांना पर्याय देण्यात आले. सेवाज्येष्ठता, रिक्त पदांची उपलब्धता, प्रशासकीय गरज आणि शासन निकषांचा वस्तुनिष्ठ विचार करून संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली.

विशेष म्हणजे, कोणताही राजकीय दबाव किंवा वैयक्तिक हितसंबंध न स्वीकारता पूर्णपणे निकषाधारित निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या निर्णयातून महसूल प्रशासनात कार्यक्षमतेला चालना देत ‘प्रशासकीय बदल्यांचा एक आदर्श नमुना’ निर्माण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande