रत्नागिरी : सावर्डे उपविभागातील 40 गावांचा वीजपुरवठा सोमवारी बंद
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । महावितरणच्या 110/33 केव्ही आरवली उपकेंद्र वाहिनीवर अत्यावश्यक व तातडीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे सावर्डे उपविभागांतर्गत येणाऱ्या अनेक गावांचा वीजपुरव
रत्नागिरी : सावर्डे उपविभागातील 40 गावांचा वीजपुरवठा सोमवारी बंद


रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । महावितरणच्या 110/33 केव्ही आरवली उपकेंद्र वाहिनीवर अत्यावश्यक व तातडीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे सावर्डे उपविभागांतर्गत येणाऱ्या अनेक गावांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

या नियोजित बंद कालावधीत सावर्डे, दहिवली, दुर्गेवाडी, डेरवण, कुडप, कामथे, कोसबी, मुंडे, मंजुत्री, आगवे, टेरव , हडकणी, फुरूस, काजरकोंड, कोंडमळा, खेरशेत, खरवते, ताम्हणमळा, नारदखेरकी, ओमळी, तुरंबव, नायशी, पालवन, मांडकी, नांदगाव, येगाव, असुर्डे, मुर्तवडे, तोंडली पिलवली, पातेपिलवली, वीर, आबिटगाव, शिरंबे, गुळवण, ढाकमोली, धोक्रोली, वहाळ, कोकरे, कुटरे, पाते आदी ४० गावांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणने नागरिकांना आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन केले असून, या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. वीजपुरवठा सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही देखभाल आणि दुरुस्तीची कामे आवश्यक असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande