रत्नागिरी : जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव राजुकुमार बालेश्वर सिंह (
रत्नागिरी : जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू


रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव राजुकुमार बालेश्वर सिंह (रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, बिहार) असे आहे. तो पोर्ट परिसरातील बी-५ कोल शेडवर उंचावर लोखंडी पर्लिंगचे काम करत होता. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामाची वेळ संपल्यानंतर राजुकुमार इतर सहकाऱ्यांसोबत खाली उतरत होता. त्यावेळी त्याने सुरक्षा हूकचा वापर केला होता. मात्र, पुढे सरकताना हूक बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो व्यवस्थित अडकला नाही. त्याच वेळी त्याचा पाय फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनाचा ताण सहन न झाल्याने पत्रा तुटला आणि राजुकुमार ४५ मीटर उंचीवरून जमिनीवर कोसळला. त्यामुळे त्याच्या हाताला, पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मरण पावल्याचे सांगितले.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande