
चंद्रपूर, 15 जून (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट सेलच्या अध्यक्षपदी शक्तीवीर धिराल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या महानगर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात शक्तीवीर धिराल यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चित्रपट, कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो. भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी चित्रपट सेलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शक्तीवीर धिराल यांना या क्षेत्राचा अनुभव असून त्यांच्या नेतृत्वात चित्रपट सेल अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, सिनेट सदस्य, निलेश बेलखेडे यांच्यासह ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव