जळगावात १९ जून रोजी जिल्हा पेन्शन,पी.एफ. कार्यशाळा
जळगाव , 15 जून (हिं.स.) : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृह येथे जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१
जळगावात १९ जून रोजी जिल्हा पेन्शन,पी.एफ. कार्यशाळा


जळगाव , 15 जून (हिं.स.) : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृह येथे जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१, मुंबई येथील चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या व प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. 19 जून रोजी सकाळी 10.30 यावेळेत कार्यशाळा घेण्यात आली आहे.जळगाव जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, निवृत्तीवेतन विषयक अडचणी व प्रश्न यावेळी सोडवून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.तसेच, आपल्या परिचयातील इतर निवृत्तीवेतनधारकांनाही या कार्यशाळेची माहिती देऊन या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande