गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे आंदोलन स्थगित
- अटींबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास ४ जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा आंदोलन सोलापूर, 15 जून (हिं.स.)। शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात
grdf


- अटींबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास ४ जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा आंदोलन

सोलापूर, 15 जून (हिं.स.)। शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवार यांच्याशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनस्थळी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन दाखल झाले होते. चर्चेदरम्यान गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. त्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त करत रोहित पवार यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली.

रोहित पवार यांनी सांगितले की, २२ जूनपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. तसेच ३० जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होणार असल्याने त्याआधी आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या चर्चेत विविध शेतकरी नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामध्ये राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, ठाकरे गटाचे नेते, शेकापचे जयंत पाटील तसेच महादेव जानकर यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्जमाफीतील दोन महत्त्वाच्या अटींबाबत समाधानकारक निर्णय झाला नाही, तर ४ जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. मात्र, सरकारला चर्चेची संधी देण्यासाठी सध्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गिरीश महाजन असेही म्हणाले की, मोदी असतील किंवा फडणवीस असतील सर्व सकारात्मक आहे. वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी लागते. तर शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देत असतो. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा निघेल. मी रोहित पवार यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande