
छत्रपती संभाजीनगर, 19 जून (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत संशयित ॲल्युमिनियम तारांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कन्हैया धर्मकाट्याजवळ म्हरोळा शिवार परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडे ५० किलो वजनाच्या ॲल्युमिनियम तारांचे सात बंडल आणि दोन मोटारसायकली आढळून आल्या. मालाबाबत बिल अथवा मालकी हक्काचे समाधानकारक पुरावे सादर करता न आल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी एकूण 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis