बीड - नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ॲक्रीलिक कमानीचे लोकार्पण
बीड, 19 जून, (हिं.स.)। पीएमश्री जिल्हा परिषद कन्या प्रशाला, आष्टी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ॲक्रीलिक कमानीचे लोकार्पण भाजपा आमदार सुरेश धस यांनी केले. स्व. अलका केरू आजबे व स्व. केरू जिजाबा आजबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री. प्रकाश केर
बीड - नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ॲक्रीलिक कमानीचे लोकार्पण


बीड, 19 जून, (हिं.स.)। पीएमश्री जिल्हा परिषद कन्या प्रशाला, आष्टी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ॲक्रीलिक कमानीचे लोकार्पण भाजपा आमदार सुरेश धस यांनी केले.

स्व. अलका केरू आजबे व स्व. केरू जिजाबा आजबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री. प्रकाश केरू आजबे व श्री. संजय केरू आजबे (संचालक, आभा प्रतिष्ठाण) यांच्या देणगीतून ही भव्य ॲक्रीलिक कमान उभारण्यात आली आहे. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्राबद्दलची आस्था निश्चितच प्रेरणादायी आहे.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, शिक्षण क्षेत्रात होत असलेली पायाभूत सुविधांची उभारणी ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पीएमश्री योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि २१ व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज शिक्षण मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असून शाळांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी आष्टी शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुर्शदपूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande