
- दररोज फक्त १० रुपयांपासून गुंतवणुकीची संधी
- म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या सुलभीकरणासाठी अभिनव उपक्रम
नाशिक, २४ जून (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी ऍक्सिस म्युच्युअल फंडाने ‘रोजाना एसआयपी’ (डेली-एसआयपी) हे नवे गुंतवणूक उत्पादन लॉन्च केले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना दररोज केवळ 10 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येणार आहे.
रोजाना एसआयपीद्वारे गुंतवणूकदारांना ऍक्सिस म्युच्युअल फंडाच्या 10 विविध योजनांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. किमान दोन योजना निवडून दररोज प्रति योजनेत 10 रुपये गुंतवता येतील. तसेच, गुंतवणूकदार आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि प्राधान्यानुसार 10 योजनांपर्यंत गुंतवणूक वाढवू शकतात. या सुविधेमध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.रोजाना एसआयपी अंतर्गत ॲक्सिस मल्टीकॅप फंड, स्मॉल कॅप फंड, व्हॅल्यू फंड, गोल्ड फंड, बॅलन्स्ड ऍडव्हांटेज फंड, मिड कॅप फंड, फ्लेक्सी कॅप फंड, लार्ज कॅप फंड, मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आणि इतर निवडक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना विविध मालमत्ता वर्गांमध्ये संतुलित गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.देशात एसआयपीद्वारे गुंतवणुकीकडे वाढता कल दिसून येत असताना, रोजाना एसआयपी हा पर्याय विशेषतः प्रथमच गुंतवणूक करणारे, विद्यार्थी, तरुण कमावते, गिग इकॉनॉमीतील कर्मचारी आणि अनियमित उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे. कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येत असल्याने आर्थिक शिस्त निर्माण करण्यास आणि भांडवली बाजारातील सहभाग वाढविण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना ऍक्सिस म्युच्युअल फंडचे डिजिटल व्यवसाय प्रमुख बोनिफेस नोरोन्हा म्हणाले की, गुंतवणूक अधिक समावेशक, सुलभ आणि सोयीस्कर बनविणे हे आमचे कायमचे ध्येय राहिले आहे. रोजाना एसआयपीच्या माध्यमातून आम्ही कमी रकमेपासून नियमित गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. डिजिटल नवकल्पनांच्या सहाय्याने अधिकाधिक लोकांना गुंतवणुकीच्या प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे.
रोजाना एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील प्रवेशाचे अडथळे कमी होतील आणि आर्थिक जागरूकता तसेच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी