अमरावती जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया ६७ शिक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना
अमरावती, 24 जून (हिं.स.) शिक्षण विभागांतर्गत समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदाची पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अर्हता व पद्धतीमध्ये ग्रामविकास विभागाच्या १८ जुलै
अमरावती जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया ६७ शिक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना


अमरावती, 24 जून (हिं.स.)

शिक्षण विभागांतर्गत समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदाची पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अर्हता व पद्धतीमध्ये ग्रामविकास विभागाच्या १८ जुलै २०२५ रोजीच्या अधिसुचनेनुसार करण्यात आलेल्या सुधारणांनुसार पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी ६७ शिक्षकांना पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. या पदोन्नती प्रक्रियेसाठी एकूण ९७ पात्र शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले होते. उपलब्ध ७१ रिक्त पदांसाठी समुपदेशन घेण्यात आले. त्यापैकी ६६ उमेदवारांनी पदोन्नती स्वीकारली, तर चार उमेदवारांनी पदोन्नती नाकारली. तसेच एक उमेदवार अपात्र असल्यामुळे गैरहजर राहिला. याशिवाय दिव्यांग (अस्थिव्यंग) प्रवर्गातील एका उमेदवारास पदोन्नती देण्यात आली. सीईओ सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी सतीश मुगल, उपशिक्षणाधिकारी किशन फोले, अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत ही पदोन्नती प्रक्रिया पार पडली. ही पदोन्नती प्रक्रिया सुरळीत व यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, विजय कविटकर आदींचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande