अमरावतीच्या नवीनकुमार पेठेंना उद्यान पंडित पुरस्कार जाहीर
अमरावती, 24 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वतीने फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार नवीनकुमार अरुणकुमार पेठे यांना जाहीर झाला असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मोर्शी तालुक्यासह
नवीनकुमार पेठे यांना उद्यान पंडित पुरस्कार


अमरावती, 24 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वतीने फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार नवीनकुमार अरुणकुमार पेठे यांना जाहीर झाला असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मोर्शी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संत्रा बागायतीतील आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित शेती, शाश्वत शेती पद्धती, निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन, शेतकरी मार्गदर्शन तसेच सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांतील त्यांच्या भरीव कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हा सन्मान जाहीर केला आहे. नवीनकुमार पेठे हे प्रगतशील, प्रयोगशील व दूरदृष्टी असलेले फलोत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विशेषतः नागपुरी संत्रा उत्पादनात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संत्रा बागांचे नियोजन, झाडांच्या वाढीचे निरीक्षण, सिंचनाचे व्यवस्थापन, मृदा व पाणी संवर्धन, सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर, उत्पादनाचा दर्जा राखणे, पॅकहाऊस व साठवण व्यवस्थापन अशा सर्व बाबींमध्ये त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नवीनकुमार पेठे यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नव्या उमेदीने, तंत्रज्ञानाच्या बळावर आणि शाश्वत शेतीच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.

तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब नवीनकुमार पेठे यांच्या शेतीमधील महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानासोबत एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर, हवामानाचा अंदाज, रोग व किडींचे निरीक्षण, सिंचनाचे वेळापत्रक, बागेतील बदलांचे नोंदवहीकरण, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन निर्णय घेणे यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केला आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande