परभणी - रामपुरी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह 5.03 लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी, 24 जून, (हिं.स.)। मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ट्रॅक्टरसह तब्बल 5 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक पंकज क
परभणी - रामपुरी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह 5.03 लाखांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 24 जून, (हिं.स.)। मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ट्रॅक्टरसह तब्बल 5 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास सातपुते व पोलीस नाईक विष्णू चव्हाण हे अवैध धंद्यांबाबत माहिती संकलित करीत होते. यावेळी रामपुरी परिसरात गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे रामपुरी परिसरात सापळा रचण्यात आला. रामपुरी-मुदगल मार्गावर संशयित ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता महिंद्रा अर्जुन 555 कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच 38 बी 4576) अवैधरीत्या रेती वाहतूक करताना आढळून आला. ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर, 50 हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची ट्रॉली तसेच ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण 5 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मधुकर ढवळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक तथा मालक कृष्णा विठ्ठलराव यादव (रा. रामपुरी, ता. मानवत) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 अन्वये मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande