वैष्णो देवी यात्रा : 50 लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन
गेल्या 6 महिन्यात प्रस्थापित झाला दर्शनाचा विक्रम कटरा, 24 जून (हिं.स.) : श्री माता वैष्णो देवी यात्रेने यंदा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी 2
माता वैष्णो देवी


गेल्या 6 महिन्यात प्रस्थापित झाला दर्शनाचा विक्रम

कटरा, 24 जून (हिं.स.) : श्री माता वैष्णो देवी यात्रेने यंदा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी 22 जूनपर्यंत तब्बल 50.70 लाख भाविकांनी माता वैष्णो देवीच्या दरबारात हजेरी लावली असून, हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 10.86 लाखांनी अधिक आहे.

मागील वर्षी याच कालावधीत सुमारे 39.84 लाख भाविकांनी वैष्णो देवीचे दर्शन घेतले होते. यंदा झालेली ही विक्रमी वाढ देश-विदेशातील भक्तांची माता वैष्णो देवीवरील अढळ श्रद्धा अधोरेखित करते. भाविकांच्या झालेल्या या लक्षणीय वाढीमागे श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल तथा श्राइन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेला अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी बनवण्यासाठी अनेक आधुनिक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

श्राइन बोर्डाने पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था, स्वच्छता, गर्दी नियंत्रण प्रणाली, आरोग्य सेवा, बॅटरी कार सुविधा, रोपवे संचालन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. याशिवाय, विविध डिजिटल सुविधांच्या माध्यमातून भाविकांचा प्रवास आणि दर्शनाचा अनुभव अधिक सोपा व सुविधाजनक करण्यात आला आहे.वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच 50 लाखांचा टप्पा पार झाल्याने आगामी महिन्यांतही यात्रेचा उत्साह आणि भाविकांची संख्या वाढत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande