जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय, इस्लामाबादने राजकारण करणे थांबवावे-पर्वथनेनी हरीश
नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.)।संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) झालेल्या एका बैठकीत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले. भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी स्पष्टपणे सांगितले की, केंद
जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय, इस्लामाबादने राजकारण करणे थांबवावे-पर्वथनेनी हरीश


नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.)।संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) झालेल्या एका बैठकीत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले. भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी स्पष्टपणे सांगितले की, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि कायम राहील. हा भारताचा पूर्णपणे अंतर्गत विषय असून त्यात कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला स्थान नाही.

सुरक्षा परिषदेच्या ‘आरिया-फॉर्म्युला’ बैठकीत बोलताना हरीश यांनी पाकिस्तानी प्रतिनिधीसोबतच बैठकीच्या सह-अध्यक्षांच्या भूमिकेवरही तीव्र आक्षेप नोंदवला.पर्वथनेनी हरीश म्हणाले, “ज्यांच्याकडून तटस्थतेची अपेक्षा होती, त्या सह-अध्यक्षांनी या व्यासपीठाचे राजकारण करण्याचा मार्ग निवडला, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे.” वेळेच्या मर्यादेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “जम्मू-काश्मीर हा भारताचा पूर्णपणे अंतर्गत विषय आहे आणि त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही.”

यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरही प्रतिक्रिया देताना म्हटले की, सह-अध्यक्ष असूनही पाकिस्तानने आपली मर्यादा ओलांडली आणि भारतीय भूभाग असलेल्या जम्मू-काश्मीरबाबत अनावश्यक टिप्पणी केली.

यापूर्वी नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू नदी जलकराराच्या संदर्भात केलेल्या युद्धाच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. भारताने म्हटले की, पाकिस्तान आपल्या देशांतर्गत अपयशांपासून आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्द्यांपासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा बेजबाबदार आणि घाबरलेल्या धमक्या देत आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य हे त्यांच्या स्वतःच्या अपयशांवर पडदा टाकण्याचा निष्फळ प्रयत्न आहे. आम्ही हे सर्व मनगढंत दावे पूर्णपणे फेटाळून लावतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande