प.बंगालमधील आमता बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, दोघांना अटक
कोलकाता, 24 जून (हिं.स.) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पश्चिम बंगालमधील हावडा ग्रामीण जिल्ह्यातील आमता परिसरात २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या स्फोटात एक ठार तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. एनआयएने
एनआयएचा लोगो


कोलकाता, 24 जून (हिं.स.) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पश्चिम बंगालमधील हावडा ग्रामीण जिल्ह्यातील आमता परिसरात २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या स्फोटात एक ठार तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते.

एनआयएने सांगितले की, आमता परिसरातील रहिवासी असफर मिद्या आणि एन्ताझुल मिद्या यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. यापूर्वी, तपास संस्थेने आरोपींच्या संशयित ठिकाणांवर तीन ठिकाणी छापे टाकले होते. तपास संस्थेनुसार, दोन्ही आरोपी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्या निर्देशानुसार, २३ फेब्रुवारी २०२२ रोजी आमता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रपूर बाजाराजवळ बेकायदेशीरपणे कच्चे बॉम्ब बनवले जात होते. बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही स्फोटक पदार्थांचा स्फोट झाला. या घटनेत जहांधर मोल्लाह, मोहब्बत मोल्लाह, मोईनुर रहमान आणि शेख महाराम गंभीर जखमी झाले होते. तर उपचारादरम्यान शेख महाराम यांचा नंतर मृत्यू झाला होता.

एप्रिल २०२४ मध्ये एनआयएने पोलिसांकडून तपास हाती घेतला. तपासात असे उघड झाले की, असफर मिद्या आणि एन्ताझुल मिद्या हे संपूर्ण बॉम्ब बनवण्याच्या ऑपरेशनवर नियंत्रण ठेवत होते. तपास यंत्रणेनुसार, हे बॉम्ब परिसरातील लोकांना घाबरवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी वापरले जाणार होते. या प्रकरणात चार आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande