आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी टप्पा-२ मधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २७ जूनपासून लेखी परीक्षा
नाशिक, 24 जून (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ टप्पा-२ मधील विविध लेखी परीक्षेचे संचलन विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २७ जून ते २२ जुलै २०२६ दरम्यान महाराष
MUHS


नाशिक, 24 जून (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ टप्पा-२ मधील विविध लेखी परीक्षेचे संचलन विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २७ जून ते २२ जुलै २०२६ दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण १६७ परीक्षा केंद्रावर होणार आहे.

यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते चतुर्थ बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस. , बी.पी. टीएच. , बी.ओ.टी. एच., बी.एस्सी. नर्सिग, पी.बी.बी.एस्सी., बेसिक बी.एस्सी. नर्सिग, बी.ए.एस.एल.पी., बी.पी.ओ., बी.ए.एम.एस., बी.यु.एम. एस., बी.एच.एम.एस., बी.पी.टी. व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे एम.एस.सी. नर्सिंग, एम.डी. होमिओपॅथी, विद्यापीठ अभ्यासक्रमाचे एम.पी.एच., एम.पी.एच. (एन.), एम.बी.ए., एम.फील., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्रीध्ऑपथलमिक, बी.पी.एम.टी, डिप्लोमा पॅरामेडिकल, पीजी डी.एम.एल.टी., सी.सी.एम.पी., एम.एस.सी. फार्मास्युटिकल यांचा समावेश असणार आहे.

सदर परीक्षेसाठी उक्त अभ्यासक्रमांचे एकूण ७८,९०० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. हिवाळी-२०२४ टप्पा.४, उन्हाळी.२०२५, हिवाळी-२०२५ सत्राच्या सर्व टप्प्यातील विविध अभ्यासक्रमांच्या व उन्हाळी २०२६ टप्पा १ परीक्षांच्याही प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिग करुन ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केलेले आहे. याचप्रमाणे उन्हाळी २०२६ टप्पा २ परीक्षेच्या अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप सिताराम कडू यांनी माहिती दिली.

वरील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थी विद्याथ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ०९.०० वाजता व दुपारी १.०० वाजता परीक्षाकेंद्रावर रिपोर्ट करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande