
कोल्हापूर, 25 जून (हिं.स.)। शिवसेना (उबाठा)गटाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. थेट मुंबईला मातोश्रीवर पाठवलेल्या अवघ्या चार ओळीच्या राजीनाम्यात त्यांनी कोणतेही राजकिय विश्लेषण करणार नसल्याचे सांगत पदाचा त्याग करीत असल्याचे म्हंटले आहे. पण कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना मात्र शिवसेना पक्षावर असलेला काँग्रेसचा प्रभाव, गटबाजी आणि राजकीय अपयश याला कंटाळून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना उबाठा पक्षात गेली १० वर्ष काम केलेले रवीकिरण इंगवले व त्यांच्या पत्नी दोघेही कोल्हापूर महानगरपालीकेचे माजी नगरसेवक आहेत. रवीकिरण इंगवले इंगवले यांनी शिवसेना शहरप्रमुख होते. अलीकडेच त्यांचेवर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पक्ष संघटक आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांनी विरोधकांच्यावर कायम धारदार भुमिका घेतली.पण पक्षाला येणारे अपयश आणि कार्यकर्त्यांचे होणारे खच्चीकरण त्यामुळे ते व्यथित झाले होते. त्यातून त्यानी जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
याबाबत माध्यमांशी बोलताना त्यानी आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. काँग्रेसच्या प्रभावाखाली पक्ष चालला त्यामुळे महापालिका, जि. प., विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही.
जनतेच्या प्रश्नावर पक्षाची आंदोलने करतानाही पक्ष नेतृत्वाकडून सहकार्य मिळाले नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगीतले. काही दिवस थांबून पुढील राजकीय वाटचाल विचारपूर्वक करणार असल्याचे रवीकिरण इंगवले यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar