लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची लाखों रुपयांनी फसवणूक
रायगड, 26 जून (हिं.स.) : लग्नाचे आश्वासन देत प्रेमसंबंध प्रस्थापित करून एका तरुणीकडून सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपये रोख घेऊन नंतर विवाहास नकार देत आर्थिक फसवणूक केल्याची घटना कर्जत तालुक्यातील गुंडगे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठा
Girlfriend-defrauded-of-lakhs-


## **हळदी समारंभात महिलेशी अश्लील वर्तन; विरोध करणाऱ्या कुटुंबावर हल्ला, स्कॉर्पिओची तोडफोड**  **कर्जत, प्रतिनिधी :** नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोमलवाडी येथे हळदी समारंभादरम्यान एका महिलेशी अश्लील वर्तन केल्यानंतर त्याचा जाब विचारणाऱ्या कुटुंबीयांवर मारहाण करत स्कॉर्पिओ वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांसह १० ते १२ अनोळखी इसमांविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खोपोली येथील फिर्यादी महिला आपल्या आई-वडील, भाऊ, बहिण व इतर नातेवाईकांसह कोमलवाडी येथे मामाच्या हळदी समारंभासाठी गेल्या होत्या. समारंभात नृत्य सुरू असताना आरोपी क्रमांक १ याने फिर्यादी व त्यांच्या मोठ्या बहिणीला मिठी मारून मोठ्या बहिणीकडे डोळा मारत अश्लील हातवारे केल्याचा आरोप आहे.  या प्रकाराबाबत फिर्यादीच्या भावाने जाब विचारला असता आरोपीने तू बाहेर भेट, तुला दाखवतो अशी धमकी देत त्याला छातीला धक्का दिला. त्यानंतर फिर्यादीचे कुटुंब खोपोलीकडे निघाले असता आरोपी क्रमांक ४ याने फिर्यादीच्या वडिलांच्या शर्टाची कॉलर पकडली. त्यानंतर आरोपी क्रमांक २ व ३ यांनी शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चारही आरोपी व त्यांच्यासोबत आलेल्या १० ते १२ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी, त्यांच्या बहिणी, आई, मावशी व काकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.  यावेळी आरोपींनी दगडफेक करून फिर्यादींच्या स्कॉर्पिओ (एमएच-४६ सीक्यू-७७१७) वाहनाच्या समोरील काच, बोनेट, आरसे, कॅमेरे, नंबर प्लेट, दरवाज्यांचे हँडल तसेच इतर भागांची तोडफोड करून मोठे नुकसान केले.  या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे करीत आहेत.


रायगड, 26 जून (हिं.स.) : लग्नाचे आश्वासन देत प्रेमसंबंध प्रस्थापित करून एका तरुणीकडून सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपये रोख घेऊन नंतर विवाहास नकार देत आर्थिक फसवणूक केल्याची घटना कर्जत तालुक्यातील गुंडगे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि गुंडगे येथील आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचा लवकरच विवाह होणार असल्याचे ठरले होते. याच विश्वासाचा फायदा घेत आरोपीने व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत फिर्यादीकडून तिच्या आईचे सुमारे दोन तोळ्यांचे लक्ष्मीहार, राणीहार, कानातले, सोन्याची चैन तसेच टप्प्याटप्प्याने 3 लाख रुपये रोख घेतले.

मात्र, दागिने आणि रोख रक्कम मिळाल्यानंतर आरोपीने विवाह करण्यास नकार दिला. तसेच, घेतलेले दागिने आणि पैसे परत करण्याची वारंवार मागणी करूनही त्याने नकार दिल्याचा आरोप फिर्यादीने आपल्या तक्रारीत केला आहे.

यानंतर पीडितेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 282/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 314, 316(2) आणि 318(4) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande