पुणे - अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त
पुणे, 04 जून (हिं.स.)। पुणे विभागात अन्न व औषध प्रशासन विभागाने १ व २ जून २०२६ रोजी भेसळीच्या संशयावरून ठिकठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत ३१ लाख ७३ हजार रुपयांचे अन्न पदार्थांची जप्ती केली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रत
gfd


पुणे, 04 जून (हिं.स.)। पुणे विभागात अन्न व औषध प्रशासन विभागाने १ व २ जून २०२६ रोजी भेसळीच्या संशयावरून ठिकठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत ३१ लाख ७३ हजार रुपयांचे अन्न पदार्थांची जप्ती केली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त करण्यासह त्यासंबंधी १४ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिली आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेनुसार अन्न व औषध प्रशासन पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात विविध आस्थापनाची तपासणी व धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

सातारा जिल्ह्यात १ जून रोजी गोडोली, सातारा येथील मेसर्स धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रा.लि. येथे केलेल्या कारवाईत प्रोटिरिच- डब्ल्यू हर्बल हेल्थ ड्रिंक, चॉकलेट कंपाऊंड, सी बकथॉर्न ज्यूस याचा एकूण २१ लाख ४० हजार ९४६ रुपयांचा अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात २ जून रोजी ४२३, मार्केट यार्ड येथील मेसर्स प्राज ट्रेडर्स येथे कारवाई करून रिफाईन्ड सोयाबीन ऑईल, आर.बी.डी. पामोलीन ऑईल याचा एकूण ५ लाख ३४ हजार २५२ रूपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. केशवनगर, काळेवाडी रोड, चिंचवड येथील मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी येथे धडक कारवाईअंतर्गत २७ हजार ६०० रूपयांचे ‘चीज ॲनालॉग’ जप्त करण्यात आले आहे.

वडगाव शेरी येथील स.नं. ५०/४, मते नगर येथील मे. विठूमाऊली डेअरी येथे भेसळयुक्त गाईचे तूप आणि पनीर असा सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. स.नं. ३७/१, सुप्रिया बिल्डिंग, खराडी येथील मे. शिवदत्त डेअरी येथे १ लाख ७३ हजाराहून अधिक रकमेचे पनीर जप्त करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात २ जून रोजी बाजारगेट, कोल्हापूर येथील मे. बनछोडे ब्रदर्स ऑईल मिल येथे ९२ हजार रुपयांचा रिफाईन्ड कॉटनसीड ऑईल व फिल्टर्ड ग्राऊंडनट ऑईलचा साठा जप्त करण्यात आला. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी येथील बालाजी चौकातील मे. रामगोपाल भवरलाल सोनी येथे ९७ हजार ६०० रुपये किमतीचा रिफाईन्ड सोयाबीन ऑईल साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. धरणगुट्टी ता. शिरोळ येथे मे. हिदांश इंडस्ट्रीज येथे टाकलेल्या छाप्यात ८ हजार ८८० रुपयांचा ॲनालॉग सुपारी साठा भेसळीच्या संशयावरून व लेबलदोष, मिथ्याछाप असल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande