रत्नागिरी : विश्व हिंदू परिषदेतर्फे ३३ जोडप्यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा
रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । अधिक ज्येष्ठ मासानिमित्त विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी, ६ जून रोजी चिपळूण येथील वीरेश्वर मंदिर परिसरात ३३ विविध समाजघटकांतील मान्यवर जोडप्यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले
रत्नागिरी : विश्व हिंदू परिषदेतर्फे ३३ जोडप्यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा


रत्नागिरी, 4 जून (हिं.स.) । अधिक ज्येष्ठ मासानिमित्त विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी, ६ जून रोजी चिपळूण येथील वीरेश्वर मंदिर परिसरात ३३ विविध समाजघटकांतील मान्यवर जोडप्यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामदैवत कालभैरव सांस्कृतिक मंच, झरी-मुरूम-तळी पाक विभाग, वीरेश्वर आरती मंडळ आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हिंदू समाजातील विविध जाती, पंथ आणि संप्रदाय यांच्यात सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक बंध अधिक दृढ व्हावेत, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी ब्राह्मण, मराठा, वैश्य, नाभिक, रोहिदास, तेली, कासार, नामदेव शिंपी, वडार, नवबौद्ध आदी विविध समाजघटकांतील ३३ जोडप्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विविध समाजघटकांना एकाच धार्मिक व सांस्कृतिक व्यासपीठावर आणण्याचा हा आगळावेगळा उपक्रम असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

कार्यक्रमानिमित्त सायंकाळी ४ ते ७ या वेळेत तीर्थप्रसादाचे वाटप तसेच हळदीकुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande