
परभणी, 04 जून (हिं.स.)।
परभणी–हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी समन्वय, निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन, तसेच विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत विकास, कार्य आणि जनहिताच्या मुद्द्यांच्या बळावर ही निवडणूक यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यांच्या बळावर परभणी–हिंगोली मतदारसंघात विजयाचा झेंडा निश्चितपणे फडकवू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार संतोष बांगर, सुरेश वरपूडकर, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव,रामराव वडकुते,बालाजी कल्यानक, जिल्हा परिषद अध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,नगराध्याक्ष,सभापती, नगरसेवक महायुतीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis