अखेरच्या क्षणी डाव पलटला, छ. संभाजीनगरमध्ये देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार
छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीसाठा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ड्रामा झाल्याचं पाहायला मिळाले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली.
अ


छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)।

विधान परिषद निवडणुकीसाठा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ड्रामा झाल्याचं पाहायला मिळाले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. परंतु त्याची आधीच कुणकुण लागलेल्या ठाकरे गटाने गणेश लोखंडे यांचा अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीने आता गणेश लोखंडेंना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जालना विधानसभेची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. त्या ठिकाणी पक्षाने देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी दिली. मात्र अर्ज माघारी घ्यायच्या काही मिनिटे आधीच देवयानी डोनगावकरांनी त्यांच्या अर्ज माघार घेतला. कोकण विधान परिषदेप्रमाणेच इथेही ठाकरेंच्या उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्ज माघार घेत स्वतःच्या पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न केला.

अपक्षाला पाठिंबा

ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे यांनी देवयांनी डोनगावकरांच्या नावाची घोषणा केली होती. देवयानी डोनगावकरांचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित होते. मात्र डोनगावकरांनी ऐनवेळी त्यांचा अर्ज मागे घेत ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, देवयांनी डोनगावकर या त्यांचा अर्ज माघार घेणार याची कुणकुण आधीच ठाकरे गटाला लागली होती. त्यामुळेच ठाकरे गटाकडून गणेश लोखेंडे यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. आता देवयांनी डोनगावकरांनी त्यांचा अर्ज माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीने गणेश लोखेंडे यांना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande