
परभणी, 01 जुलै (हिं.स.) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर आणि परभणी जिल्ह्यातील भूमिपुत्र पी. टी. घुगे, भगवान दुधाटे आणि एम. डी. शिंदे यांची सहकारी संस्थांच्या उपनिबंधकपदी पदोन्नती झाली आहे.
पंढरीनाथ घुगे हे जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथील रहिवासी असून त्यांची पुणे शहरासाठी उपनिबंधक म्हणून नियुक्ती झाली आहे. भगवान दुधाटे हे पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी असून त्यांची ठाणे येथे उपनिबंधकपदी पदोन्नती झाली आहे. तसेच माधव देवराव शिंदे हे गंगाखेड तालुक्यातील मसला येथील रहिवासी असून त्यांची मुंबई विभाग (डी. विभाग) येथे उपनिबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदोन्नतीबद्दल कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कृषिमित्रांनी तिन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis