सोलापूर जि.प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची बदली; आसिफ खैरदी यांची नियुक्ती
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील ३६ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांची नांदेड जिल्हा परिषदेत बदली करण्
fgdf


सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील ३६ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांची नांदेड जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था, लातूर येथील कार्यकारी अभियंता आसिफ परवेझ खैरदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी खैरदी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेत औपचारिकपणे पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांचीही भेट घेतली. यावेळी अध्यक्ष वैद्य यांनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला.

विशेष म्हणजे, खैरदी हे मूळचे सोलापूरचे रहिवासी असून यापूर्वी त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात उपअभियंता म्हणून काम केले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि जिल्ह्यातील विकासकामांचा त्यांना अनुभव असल्याचे मानले जात आहे.दरम्यान, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्या बदलीनंतर आणि खैरदी यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील विविध विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande