पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अंबाजोगाईसाठी ७१ घरकुलांना मंजुरी
बीड, 14 जुलै (हिं.स.)। अंबाजोगाई शहरात सर्वसामान्य व गरजू नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासनाच्या ''पंतप्रधान आवास योजना २.०'' (PMAY 2.0) अंतर्गत नव्याने ७१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. नवी दिल्ली येथे पार पड
घरकुलांना मंजुरी


बीड, 14 जुलै (हिं.स.)। अंबाजोगाई शहरात सर्वसामान्य व गरजू नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'पंतप्रधान आवास योजना २.०' (PMAY 2.0) अंतर्गत नव्याने ७१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या केंद्रीय मंजुरी आणि संनियंत्रण समितीच्या (CSMC) बैठकीत या प्रकल्पाला अधिकृत मान्यता देण्यात आली. या महत्त्वपूर्ण कामासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आमदार नमिता अक्षय मुंदडा यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यासोबतच आणखी ६६ गरजू कुटुंबांसाठी नवीन घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला असल्याचे नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले आहे.

या महत्त्वपूर्ण गृहनिर्माण प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ४६१.५० लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा वाटा १०६.५० लाख रुपये तर राज्य सरकारचा वाटा ७१.०० लाख रुपये असणार आहे. उर्वरित २८४.०० लाख रुपये हा प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा हिस्सा असेल. प्रशासकीय मान्यतेनंतर अंबाजोगाई नगरपालिकेकडून हा प्रकल्प राबवला जाणार असून, यामुळे शहरातील पात्र आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार नमिता मुंदडा यांचे आभार मानले आहेत.

शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार नमिता मुंदडा आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे सातत्याने कार्यरत आहेत. यापूर्वी नगरपालिकेत प्रशासक राजवट असताना देखील आमदार नमिता मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नांतून शहरासाठी तब्बल १०२ घरकुले मंजूर करण्यात आली होती. आता या ७१ घरकुलांच्या अंतिम मंजुरीवरच न थांबता शहर विकासासाठी नगरपालिका प्रशासन अधिक गतीने काम करत आहे. शहरातील आणखी ६६ गरजू कुटुंबांसाठी नवीन घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिली आहे. या प्रलंबित प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू असून, त्यालाही अत्यंत अल्पावधीतच मंजुरी मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या सक्रिय व तळागाळातील नागरिकांसाठी असलेल्या भूमिकेमुळे अंबाजोगाईच्या सर्वसामान्य जनतेमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande