इराणवरील अमेरिकी हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू, २६० पेक्षा जास्त जखमी
तेहरान , 15 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इराण सरकारच्या प्रवक्त्या फातेमेह मोहाजेरानी यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये अलीकडच्या काही दिवसांत ३० हून अधिक लोक
इराणवरील अमेरिकी हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू, २६० पेक्षा जास्त जखमी


तेहरान , 15 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इराण सरकारच्या प्रवक्त्या फातेमेह मोहाजेरानी यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये अलीकडच्या काही दिवसांत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा मृत्यूचा आकडा नेमक्या कोणत्या कालावधीतील आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही.

इराण सरकारचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी रात्रीभर सुरू असलेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यांमध्ये २६० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

इराणी लष्कराने म्हटले आहे की, इरानशहर येथील बम्पूर गॅरिसनवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात त्यांच्या सात सैनिकांचा मृत्यू झाला. तसेच योग्य वेळी या हल्ल्याला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही लष्कराने दिला आहे. लष्कराने या कारवाईला “भ्याड आक्रमकता” असे संबोधले आहे.लष्कराच्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने बम्पूर येथील लष्करी तळावर १३ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात ३८८ व्या ब्रिगेडमधील सात सैनिक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

इराणी लष्कराने दावा केला की, “निष्क्रिय संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे” जीवितहानी मर्यादित ठेवणे शक्य झाले. तसेच अमेरिकेचा उद्देश जास्तीत जास्त जीवितहानी घडवून आणण्याचा होता, असा आरोपही करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये लष्करी तळावरील अतिथीगृह, सुरक्षा चौक्या आणि निवासी सुविधा लक्ष्य करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने रात्रीभर केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांमध्ये २६० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. अलीकडील काळात इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या इतर कोणत्याही हल्ल्यांच्या तुलनेत यावेळी जखमींची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात पर्शियन आखाताच्या प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून तणाव कायम आहे. जागतिक स्तरावर समुद्री मार्गाने होणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापाराचा मोठा हिस्सा या अत्यंत महत्त्वाच्या सामरिक जलमार्गातूनच होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande