परळीत सिमेंट फॅक्टरी जवळील रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात मृतदेह
बीड, 21 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील टीपीएस कॉलनी परिसरात एका माणसाचा तुटलेला पाय आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बातमी व
परळी रेल्वे स्टेशन


बीड, 21 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील टीपीएस कॉलनी परिसरात एका माणसाचा तुटलेला पाय आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. टीपीएस कॉलनी परिसराची कसून पाहणी केल्यानंतर पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली. सिमेंट फॅक्टरी जवळ असलेल्या परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (बॉडी) आढळून आला आहे.

टीपीएस कॉलनी येथे सापडलेला पाय आणि रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह यांचा परस्परांशी थेट संबंध असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रेल्वे अपघातात किंवा अन्य कारणाने मृतदेहाचा अवयव वेगळा होऊन तो श्वानाने टीपीएस कॉलनीपर्यंत नेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आढळलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परळी शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande