
कोल्हापूर, 23 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी काँग्रेसविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
निषेध आंदोलनाची सुरुवात भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथून करण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक व कार्यकर्ते टू व्हीलर ने व्हीनस कॉर्नर या ठिकाणी एकत्रित जमा झाले. यानंतर घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध केला. देशात अराजकता माजणाऱ्या काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, खोटे बोलणाऱ्या काँग्रेस पार्टीचे प्रमुख राहुल गांधी शरम करा ! शरम करा ! संसदेचा अपमान काँग्रेसची हीच ओळख,
जय श्री राम, समाधान नाही संघर्ष काँग्रेसचा हाच स्वभाव,
काँग्रेस हाय हाय !
राहुल गांधी हाय हाय !
प्रियंका गांधी हाय हाय !
अशा घोषणांचे फलक दाखवून घोषणा देण्यात आल्या.
व्हिनस कॉर्नर येथून निघालेला हा मोर्चा पोलीस प्रशासनाने अडवला यावेळी पोलिस प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी झटापट झाली. काँग्रेस विरोधी घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी पोलीस प्रशासनाने बॅरॅकेट लावून कार्यकर्त्यांना अडवले आणि अटक करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले की, काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नये. काँग्रेसचे अस्तिव धोक्यात आल्यामुळे काँग्रेस या पद्धतीचे आंदोलने करीत आहे काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कशाचेही देणे घेणे नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली विरोधकांना कोणत्याही पद्धतीच्या त्रुटी मिळत नसल्याकारणाने अशा प्रकारचे दिशाहीन आंदोलने त्यांच्याकडून सुरू आहेत या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.
यावेळी आमदार अमल महाडिक म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी संसदीय मार्गाने सरकारला प्रश्न विचारू शकले असते. लोकसभेत त्यांना याबाबत विचारणा करता आली असती मात्र संसदेचे अधिवेशन बंद पाडून पंतप्रधानांच्या घरासमोर निदर्शने करणे हे अशोभनीय आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.
भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, आंदोलनाच्या नावाखाली देशाच्या सर्वोच्च लोकशाही संस्थांचा, संवैधानिक पदांचा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांचा अवमान होईल अशा प्रकारचे वर्तन लोकशाहीला शोभणारे नाही.
या आंदोलनास आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महापौर रापाराणी निकम, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा.जयंत पाटील, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, सरचिटणीस विराज चिखलीकर, नगरसेवक प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, विजयेंद्र माने यांच्यासह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar