
नांदेड, 23 जुलै (हिं.स.)।
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदानपूर्व आढावा,प्रचार,संवाद बैठक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राजेश पवार, माजी आ.हणमंतराव बेटमोगरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण चिखलीकर यांनी उपस्थित मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.
सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या सक्षम व पारदर्शक नेतृत्वाच्या बाजूने कौल देण्याचे आवाहन करण्यात आले तसेच शेतकरी विकास पॅनल'चे जिल्हाक्षेत्र मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर दहिफळे, रामचंद्र मुसळे, अनिल बाभळीकर या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.
यावेळी माजी आमदार माधवराव जवळगावकर, राष्ट्रवादी दक्षिण नांदेड जिल्ह्याध्यक्ष शिवराज होटाळकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिनविरोध संचालिका सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर आदींची उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis