
ठाणे, 23 जुलै (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील विविध प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स हटविण्याची व्यापक कारवाई करण्यात आली. दिवसभरात एकूण १३५ कारवाया करण्यात आल्या.
या कारवाईमध्ये दिवा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक ७८, लोकमान्य सावरकरनगरमध्ये १६, नौपाडा-कोपरीमध्ये १२, वर्तकनगरमध्ये ११, माजीवडा-मानपाडामध्ये ११ आणि वागळे प्रभागात ७ कारवाया करण्यात आल्या.
ठाणे महानगरपालिका शहर विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमितपणे सुरू ठेवणार असून, अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स व जाहिराती लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर