

पाच धरणातून पाण्याचा विसर्ग, इगतपुरीत सहा गावांचा संपर्क तुटला, दरड कोसळली
नाशिक, 23 जुलै (हिं.स.)।
- जिल्ह्यामध्ये पावसामुळे जनजीवनावरती परिणाम झाला असून फक्त बारा तासांमध्ये 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यामध्ये सहा गावांचा संपर्क तुटला असून गंगापूर दारणा सह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दुतोंड्या मारुती कमरेपेक्षाही जास्त बुडाला आहे.
पावसाचे पुष्य नक्षत्र सोमवारी 20 जुलैपासून सुरू झाल्या असून पाऊस सातत्याने सुरू आहे मागील पुनर्वसू नक्षत्रामध्ये चार दिवस पाऊस पडल्यानंतर आता पुन्हा पावसाने जोर पकडला आहे जिल्ह्यामध्ये या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळी मध्ये देखील वाढ झालेली आहे त्यामुळे गंगापूर धरणातून 5295 दारणा धरणातून 15 हजार 498 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 25 हजार 925 नदी प्रवाहात सोडलेला आहे तर भाहुली हरणबारी ही धरणे 100 टक्के भरली आहे. या धरणातूनही नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुधवारी दिवसभर फक्त एक मिलिमीटर पावसाची नोंद झालेली होती तर बुधवारी सायंकाळी सर्वसाधारण साडेसात वाजेपासून सुरू झालेल्या पाऊस हा गुरुवारी देखील सुरू होता. बुधवारी रात्री पासुन गुरवारी सकाळ पर्यंत 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . या पावसामुळे शहरातील जनजीवनावरती मोठा परिणाम दिसून आला त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत रस्ते पूर्णपणे मोकळे होते रस्त्यांवरती गर्दी देखील कमी दिसत येत होती सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम हा झाल्यामुळे कामगारांना कामावर जाण्यासाठी उशीर झाला.
इगतपुरी तालुक्यामध्ये सहा गावांचा संपर्क तुटला
इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तालुक्यातील संपर्क यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिंप्री सदो येथील पूल पाण्याखाली गेला असून, अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या पुलावरून पाण्याचा मोठा लोट वाहत आहे. या पूरस्थितीमुळे भावली, बोर्ली, पिंप्री सदो, जामुंडे, गवांडे आणि धामडकीवाडी या प्रमुख गावांचा इगतपुरी शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. या भागातील नागरिकांना दळणवळणाच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचा जोर ओसरत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पुलावरून प्रवास करू नये, असे सक्त आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इगतपुरीच्या घाटमाथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भरवज मांजरगाव रोडवर दरड कोसळली आहे. रस्ता बंद झाल्यामुळे मांजरगाव आणि आंबेवाडी या गावांचाही शहराशी संपर्क तुटला आहे. दरड कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातत्याने या परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे तर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद निवासी उपजिल्हाधिकारी रजपूत यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे
जिल्ह्यातील सात मोठे आणि 19 मध्यम अशा 26 धरणांमध्ये 61.86% पाणीसाठा आहे त्यामध्ये गंगापूर धरणात 90.71 कश्यपी 61.88 गौतमी 96.68 आळंदी 59. 93 पालखेड 51 करंजवण पन्नास पॉईंट 49 वाघाड 50.54 ओझरखेड 56.20 पुणे गाव 97.91 तिसगाव 21.10 दारणा 85.93 , मुकणे 40.56 वालदेवी 96.47 कडवा 80.98 भाम 87.34 वाकी 38.40 भोजापुर 80.33 चणकापूर 80.34 गिरणा 42.52 पुनद 56. 13 इतका पाणीसाठा धरणांमध्ये सध्या उपलब्ध आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV