नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष - नाशिक जिल्हाधिकारी
नाशिक, 26 जुलै (हिं.स.)। सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर, वांझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे आणि मोहपाडा (चि.) या गावांमध्ये (दि. २५ व २६ जुलै २०२६) सकाळी ९.५५ ते दुपारी १२.१० व मध्यरात्री नंतर या कालावधीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोण
Citizens should not believe


नाशिक, 26 जुलै (हिं.स.)।

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर, वांझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे आणि मोहपाडा (चि.) या गावांमध्ये (दि. २५ व २६ जुलै २०२६) सकाळी ९.५५ ते दुपारी १२.१० व मध्यरात्री नंतर या कालावधीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून, जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणांकडून घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर असत्यापित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) पूर्ण क्षमतेने कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२५३-२३१४१८१ उपलब्ध आहेत.

भूकंपमापन यंत्रणा (MERI, नाशिक) व संबंधित तज्ज्ञांकडून सद्यस्थितीचे सातत्याने विश्लेषण करण्यात येत असून, पुढील अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande