
भिंती खिडक्या हलल्या, आश्रम शाळेच्या भिंतीला तडे गेले
सुरगाणा, 26 जुलै (हिं.स.)।
- नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण या तालुक्यांमध्ये दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे टक्के जनविले असून भूकंपाचा केंद्रबिंदू हा नासिक पासून 45 किलोमीटर अंतरावर ती आहे या धक्क्यामध्ये पेठ तालुक्यातील आश्रम शाळेला तडे गेल्याची घटना देखील घडली आहे.
नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे धक्के आहे जानवील्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणविले होते . त्यानंतर प्रशासन सतर्क झालेलं होतं त्यामुळे या परिसराची सातत्याने संपर्क ठेवला जात होता. नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव व इतर भागांचा दौरा केला या ठिकाणी नागरिकांशी त्यांनी चर्चाही केली होती.
शनिवारी रात्री म्हणजेच रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी आणि कळवण या चार तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यात दळवट या परिसरामध्ये शनिवारी रात्री अकरा वाजून 56 मिनिटांनी भूकंपाचे धक्के सर्वसाधारण 20 ते 30 सेकंद जाणविले या काळात जोपर्यंत भूगर्भातील हालचालींच्या धक्क्यांची जाणीव होत होती तोपर्यंत घराच्या भिंती आणि खिडकीच्या काचा आणि काही परिसरामध्ये खिडक्या देखील हलत असल्याचे नागरिकांकडून प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
सुरगाणा तालुक्यात बोरगावला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे शनिवारी मध्यरात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी या परिसराला भूकंपाचा धक्का जाणवेल याची माहिती नागरिकांकडून प्रशासनाला देण्यात आली आहे. तर याच तालुक्यातील सराड, चिखली, व अन्य परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळी दोन वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत यावेळी सरळ येथील शासकीय आश्रम शाळेच्या भिंतीला मोठे तडे देखील गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर पेठ तालुक्यातील शिवसेना गावाला मध्यरात्री दोन वाजून 44 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे दिंडोरी तालुक्यातील ही ननाशी गाडगी वाडा या परिसरामध्ये रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के आहे जाणविल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.
नागरिकांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने सीडीओ मेरी येथील भूकंपमापन विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी नाशिक पासून 45 किलोमीटर अंतरावर ती भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले असून रिक्टर्स स्केल वरती 3.6 इतकी नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे सातत्याने जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने सर्व ती तयारी केली आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर वरती विश्वास ठेवू नये चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रजपूत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV