अजित दादा हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते : मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर, 26 जुलै (हिं.स.) - दादांच्या निधनाने राज्यात मोठी हानी झाली असून, अजित दादा हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते. दादा जरी आपल्यात नसले तरी दादांचे विचार व आचार आपण आत्मसात करून आपल्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार यांना अधिक बळ देऊन राज्याला
अजितदादा पवार


लातूर, 26 जुलै (हिं.स.) - दादांच्या निधनाने राज्यात मोठी हानी झाली असून, अजित दादा हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते. दादा जरी आपल्यात नसले तरी दादांचे विचार व आचार आपण आत्मसात करून आपल्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार यांना अधिक बळ देऊन राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करणार आहोत. तसेच, राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी शासनाने केली असून जिल्ह्यातील जवळपास ५४ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमुक्ती लवकरच होणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

दादांच्या आठवणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून दादांची जयंती ऐतिहासिक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

चाकूर येथील जगत जागृती विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकूर तालुका, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि माऊली ब्लड बँक लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री बाबासाहेब पाटील उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून जगत जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेश पाटील चाकूरकर, तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, नगराध्यक्ष भागवत फुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande