अंबाजोगाईत तिरट जुगारावर छापा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा दाखल
बीड, 26 जुलै (हिं.स.)। अंबाजोगाई शहरालगतच्या शेपवाडी शिवारातील अजय हॉटेलच्या पाठीमागे बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल आणि दुचाकी अ
पोलिसांचा छापा


बीड, 26 जुलै (हिं.स.)।

अंबाजोगाई शहरालगतच्या शेपवाडी शिवारातील अजय हॉटेलच्या पाठीमागे बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल आणि दुचाकी असा एकूण दोन लाख आठ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर यांच्या फिर्यादीनुसार, काही तरुण अजय हॉटेलच्या पाठीमागे गोलाकार बसून पैशांवर तिरट जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी छापा टाकला असता प्रेम शिवाजी जाधव (वय २५, रा. पुस, ह.मु. नागझरी परिसर, अंबाजोगाई), अतीक फारुक शेख (वय २४, रा. पिंपळा धायगुडा), मयुर मधुकर भिसे (वय २४, रा. पिंपळा धायगुडा) आणि मयुर लहु गोरे (वय २२, रा. पिंपळा धायगुडा) हे जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले.

या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या डावावरील रोख रक्कम, पत्ते, वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकली असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे आणि मुंडे हे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande