
- माझं लातूर परिवाराने हाती घेतलेल्या मोफत पंढरपूर वारी उपक्रमाचे ६ वे वर्ष
लातूर, 26 जुलै (हिं.स.)।
माझं लातूर परिवाराने हाती घेतलेल्या मोफत पंढरपूर वारी उपक्रमाअंतर्गत रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील ३०१ भाविक वारकऱ्यांना ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून वारी घडवून आणण्यात आली. सकाळी ७ वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले.
मोफत पंढरपूर वारी या उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय देखील अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis