
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेश कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा सिडको एन-२, महालक्ष्मी चौक, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. मंत्री अतुल सावे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
विद्यार्थी हित, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर कार्य करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याला या नव्या कार्यालयातून अधिक बळ मिळेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हे कार्यालय प्रेरणादायी केंद्र ठरेल, असा विश्वास आहे.
यावेळी कॅबिनेट मंत्री ना.श्री.अतुल सावे राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे सह-सरकार्यवाह श्री.अतुलजी लिमये, सीईओ टॉरल इंडिया श्री.भरत गिते, एबीव्हीपी राष्ट्रीय संघटन मंत्री श्री.आशिष चव्हाण, श्री.राहुल पागारिया, श्री.मनिष पाटील, प्रा.डॉ.सुरेश मुंडे, डॉ.वरुणराज नन्नवरे, वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री संजय सावकारे, राज्यमंत्री ना.मेघणाताई बोर्डिकर, डॉ.भागवत कराड, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग श्री.अतुल चव्हाण साहेब, आमदार श्री.सुहास शिरसाठ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis