छ. संभाजीनगरः मानवी साखळीद्वारे जनजागृती नशामुक्त जीवनासाठी संकल्प
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहागंज परिसरात विद्यार्थ्यांनी मानवी
Q


छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहागंज परिसरात विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन त्याद्वारे नशामुक्तीबाबत जनजागृती केली. विनय गौडा जी.सी. यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जिवनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

जिल्हा परिषद, माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभाग,सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभाग ह्या उपक्रमात सहभागी झाले. तब्बल २ हजार शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. नशा छोडो, परिवार जोडो – नशा छोडो, भारत जोडो या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' ही मानवी रांगोळी ५०० विद्यार्थ्यांनी साकारली. त्याचे ड्रोनद्वारे चित्रण करण्यात आले.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती दिपाली थावरे,निता श्रीश्रीमाळ,गिता तांदळे, विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ,जालम चौरे, सुनिता वाघ, ज्ञानेश्वर रोडगे उपस्थित होते. नशामुक्त भारत अभियानाचे मास्टर ट्रेनर डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना नशामुक्तीची शपथ दिली. राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय, डॉ. झाकीर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय,सर सय्यद महाविद्यालय,डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, रोशनगेट,मलिकंबर उर्दू हायस्कूल, रजा रोड, अनिसा उर्दू हायस्कूल, रविंद्रनगर,विनर्स इंग्लिश हायस्कूल, रविंद्रनगर,खैरुल मोमिनीन उर्दू हायस्कूल, राडपुरा,इकरा बॉईज हायस्कूल, एस.टी. कॉलनी, भारतीय विद्या मंदिर, रोशनगेट,अल्मीर उर्दू हायस्कूल, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालय, अल्लमा शिब्ली उर्दू हायस्कूल इ. शाळांनी यात सहभाग घेतला. सूत्रसंचालन शेख रशीद रहीमान यांनी तर भाऊ पठाडे यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande