नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही भूकंपाचे धक्के, भुस्खलनात रस्ता खचला
सुरगाणा, 27 जुलै (हिं.स.)। - जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही भूकंपाचे टक्के जाणवले असून सोमवारी सायंकाळी तालुक्यातील बोरगाव येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. दरम्यान तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचे भुस्खलन देखील झाल्याची घटना समोर आली असून य
Earthquake tremors continue


सुरगाणा, 27 जुलै (हिं.स.)।

- जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही भूकंपाचे टक्के जाणवले असून सोमवारी सायंकाळी तालुक्यातील बोरगाव येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. दरम्यान तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचे भुस्खलन देखील झाल्याची घटना समोर आली असून या ठिकाणी सुरू करण्याचे तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसण्याच्या घटना सुरू आहे लागोपाठ तिसऱ्या दिवशी देखील ही घटना कायम असून जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी सोमवारी सायंकाळी 7.23 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली असून प्रशासनाने पुढील पावले उचलण्यात सुरुवात केली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील तुळशीराम वाघमारे यांच्या जमिनीचे भुस्खलन झाल्याची घटना घडली असून याबाबत सुरकाराचे तहसीलदार राठोड यांनी अहवाल प्रशासनाला पाठवला असून त्यामध्ये म्हटले आहे की हे भूतखलन 26 जुलै रोजी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यामुळे भरमाड पाडा ते माळगाव असा रस्ता देखील जात असून त्याचे देखील नुकसान होण्याची भीती तहसीलदारांनी आपल्या अहवालात व्यक्त केलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande