महाराष्ट्र कबड्डी दिनानिमित्त प्रेरणादायी गौरव सोहळा!
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र कबड्डी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस, जालना शहर व जिल्हा कबड्डी असोसिएशन, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय गुणवंत कबड्डी खेळाडू, पंच व प्रशिक्षकांचा भव्य गौरव सत
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र कबड्डी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस, जालना शहर व जिल्हा कबड्डी असोसिएशन, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय गुणवंत कबड्डी खेळाडू, पंच व प्रशिक्षकांचा भव्य गौरव सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

हा प्रेरणादायी उपक्रम प्रा. सोपानराव तेलगड व प्रशांत तेलगड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू, पंच व प्रशिक्षकांचा यावेळी सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास आ. अर्जुनराव खोतकर, नाझेरजी काझी, शेख महेमुद भाई, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, रविंद्र तौर, पंडितराव भुतेकर, भाऊसाहेब घुगे, शकुंतलाताई कदम, शहा आलम खान, विष्णू पाचफुले, अशोक पडुळ, मिर्झा अन्वर बेग, गणेशराव कावळे वंदनाताई खांडेभराड,रिकंल तायड शितल बारोटे,तसेच अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.खेळाडूंचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा गौरव होय

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande