क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे २८ ते ३० जुलै या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन
नांदेड, 27 जुलै (हिं.स.)।स्वारातीम विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत कार्यरत क्रीडा प्राध्यापकांना क्रीडा क्षेत्रातील आधुनिक घडामोडी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क्रीडा धोरण, क्रीडा मैदानांचे नियोजन तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या
क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे २८ ते ३० जुलै या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन


नांदेड, 27 जुलै (हिं.स.)।स्वारातीम विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत कार्यरत क्रीडा प्राध्यापकांना क्रीडा क्षेत्रातील आधुनिक घडामोडी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क्रीडा धोरण, क्रीडा मैदानांचे नियोजन तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या क्रीडा धोरणाची अद्ययावत माहिती मिळावी, या उद्देशाने विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे २८ ते ३० जुलै या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उद्घाटन मंगळवारी (ता. २८) कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन,अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, अधिसभा सदस्य डॉ. दीपक बच्चेवार, डॉ. महेश बेंबडे, क्रीडा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास पाळणे, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेत दहा तांत्रिक सत्रांत विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संवाद आणि प्रात्यक्षिकांद्वारे आधुनिक ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. समारोपाच्या दिवशी क्रीडा प्राध्यापकांची वार्षिक सभा होणार आहे. यशस्वितेसाठी संजयसिंह ठाकूर, शिवाजी हंबर्डे, राम किरकन, सुनील लुटे, रतनसिंग पुजारी पुढाकार घेत आहेत. क्रीडा प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भास्कर माने यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande