सोलापूरात धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आईसह 14 वर्षीय मुलीची आत्महत्या
सोलापूर, 27 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सुशील नगर परिसरासह संपूर्ण शहरात शोककळ
Nsjs


सोलापूर, 27 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सुशील नगर परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मृतांची नावे वर्षा पांडुरंग अधटराव (वय 33) व स्वरा पांडुरंग अधटराव (वय 14, रा. सुशील नगर, सैफुल, सोलापूर) अशी आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर–टिकेकरवाडी रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ रविवारी सकाळी सुमारे 6 वाजता दोघी गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल जी. एस. मणुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघींना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आई व मुलीने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande