
पुणे, 27 जुलै (हिं.स.)। पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे माहे ऑगस्टमध्ये मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ३, ४ आणि ५ ऑगस्ट २०२६ रोजी खेड, १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी मंचर, १७, १८ आणि १९ ऑगस्ट रोजी जुन्नर, २४, २५ आणि २७ ऑगस्ट रोजी वडगाव मावळ आणि २८ व ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु