सेलूत 35 दिव्यांग लाभार्थ्यांना रेल्वे पासचे वितरण; संघर्ष दिव्यांग संघटनेचा पुढाकार
परभणी, 27 जुलै (हिं.स.)। सेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथे संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांची विशेष बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत 35 दिव्यांग लाभार्थ्यांना रेल्वे प्रवासासाठी रेल्वे पासचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांचे दिव्य
सेलूत 35 दिव्यांग लाभार्थ्यांना रेल्वे पासचे वितरण; संघर्ष दिव्यांग संघटनेचा पुढाकार


परभणी, 27 जुलै (हिं.स.)।

सेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथे संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांची विशेष बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत 35 दिव्यांग लाभार्थ्यांना रेल्वे प्रवासासाठी रेल्वे पासचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांचे दिव्यांगजन रेल्वे ओळखपत्र (रेल्वे आयडी) तयार करून देण्यात आले. बैठकीदरम्यान ज्या दिव्यांगांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी झाली नव्हती, त्यांची तत्काळ नोंदणी करण्यात आली. तसेच ज्यांचे यूडीआयडी (युनिक दिव्यांग ओळखपत्र) केवायसी अद्ययावत नव्हते, त्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली. तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन लवकर जमा व्हावे तसेच त्यांच्या विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी संघर्ष दिव्यांग संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष किशोर वैजनाथ साळवे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष अबरार पठाण, सचिव प्रकाशराव भाले, सहसचिव पप्पू चव्हाण, मार्गदर्शक मधुकर नाना काळे, उपमार्गदर्शक संदीप फुलारी, विनोद खाडे, हरिनारायण बाहेती, प्रकाश परळकर, सलमा पठाण, रेखाताई चव्हाण, अश्रि्वनीताई घोगरे, ज्योतीताई गायकवाड, अंजना गायकवाड, बालिका ठोंबरे, संगीताबाई पवार, पूजाताई धोंगडे आणि शकीलाबाजी शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. या बैठकीस सेलू शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. विविध शासकीय सेवा, कागदपत्रे व योजनांबाबत मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande