माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची अधीक्षकांकडून पाहणी
बीड, 27 जुलै (हिं.स.) : बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सोमवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन ठाण्याच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. अचानक झालेल्या या भेटीमुळे ठाणेदारांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ
बीड पोलीस अधीक्षक


बीड, 27 जुलै (हिं.स.) :

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सोमवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन ठाण्याच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. अचानक झालेल्या या भेटीमुळे ठाणेदारांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ लगबगीचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांच्या नोंदी, तपासाची प्रगती, प्रलंबित प्रकरणे, अभिलेख, स्टेशन डायरी, मालखाना तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याची स्वच्छता, शिस्त आणि कार्यालयीन व्यवस्थेचीही पाहणी केली.

यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांचा जलद आणि गुणवत्तापूर्ण तपास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

पोलीस ठाण्यातील विविध नोंदी अद्ययावत ठेवणे, प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande